नांदेड : आम्ही लोकांवर टीका टिप्पनी करण्यात वेळ घालत नाही, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करतोय. रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. आता वाघ कसा पाळला जाणार ? कुत्री- मांजरं पाळली जात असतात. वाघ पाळला जात नाही. (Maharashtra Politics) वाघ स्वतंत्र असतो. त्याचा स्वतंत्र बाणा असतो. रामदास […]
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले असल्याचे विखे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे ते सतत काहीतरी बडबड करत असतात. वाचाळपणा करुन ते आरोप करत […]
रत्नागिरी : आज शिवसेना (Shivsena)शिंदे गटाच्या (Shinde Group) रत्नागिरीमधील (Ratnagiri)सभेत रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, एक दिवस येईल समोर, आज काही बोलत नाही. पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कोणाचे हॉटेल श्रीलंकेला (Shrilanka)आहेत. कोणाचे हॉटेल सिंगापूरला(Singapur) आहेत. कोणाचे हॉटेल लंडणला (London) आहेत. कोणाच्या प्रॉपर्ट्या अमेरिकेला(America) आहेत. […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी मंत्रिमंडळातील अनेक आमदार अनुपस्थित होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांपेक्षा जास्त काळ मी समाजकारणात घालवला आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे अजित पवारांनी माझ्याबद्दल जी टिका केली त्याबद्दल खेद […]
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. टीका करतानाही भाषेचे ताळतंत्र दोघांकडून ठेवले जात नसल्याचे अनेकदा दिसते. मात्र असे असले तरी राणे आणि जाधव यांच्यातील हे वैर कायम स्वरुपी असेच होते असे […]
मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे आगामी निवडणुकांसाठी शिंदे व फडणवीस सरकार तयारीत आहे तर महाविकास आघाडीकडून देखील तयारी सुरु आहे. एकीकडे जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत काहीसे बिनसले असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आता युतीला इशारा दिला आहे. भाजपला आमची […]