नाशिक : दिवंगत लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं स्मारक हे 2014 मध्ये बांधल्या जाणार होतं. मात्र, आज इतके वर्ष झाली तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. दरम्यान, आता गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा उपेक्षित-वंचित घटकांसाठी शिक्षणविषयक आणि वैद्यकीय सुविधा द्या, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी केली. सिन्नर […]
Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणारून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचे म्हटले. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर मात्र एक वेगळाच प्रसंग घडला. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांनी ठाकरे […]
अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे योगेश कदम यांना संपवण्यासाठी खेडवर चालून आले, याच उत्तर १९ तारखेला मिळेल. असं रोखठोक हल्लाबोल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्या दि. १९ मार्च रोजी खेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने रामदास कदम बोलत होते. काही दिवसापूर्वी […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी 2024 साली विधानसभेच्या निवडणुकीत 240 जागा लढवणार व शिवसेना 48 जागा लढवणार असे विधान केले आहे. यावरुन राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाची हीच लायकी आहे. 2014 साली शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली […]
नाशिक : शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. राज्याच्या बहुतांश भागात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. त्या सभेची पूर्ण तयारी अद्वय […]
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही विधानसभेच्या 240 लढवणार असे म्हटले होते. यावरुन आता त्यांनी सारवासारव केली आहे. तसेच त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. अजून आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, असे ते म्हणाले आहेत. प्रसिध्दी प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना बावनकुळे म्हणाले होते की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत […]