मुंबई : आज विधान परिषद सभागृहात शिक्षक, पदवीधर (Teacher and graduate constituency)निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या शपथविधीवेळी अचानक एकच वादा, अजित दादा, (Ajit Pawar)अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA)आमदारांनी दिल्या. त्यामुळं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. नेमका हा काय प्रकार आहे, त्यावेळी अनेकांना समजेनासं झाल्याचं पाहायला मिळालं. आज […]
मुंबई : ‘रत्नागिरीत एक पत्रकार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बाजू मांडत होते. मात्र रिफायनरी झाल्यावर त्यातून लाभ मिळणार असल्याने भाजपच्या एका कार्यकर्त्याने चिडून त्यांना गाडीखाली चिरडले आहे. महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला.’ अशी शिंदे-फडणवीसांवर राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. […]
मुंबई : शिवसेना पक्षाची (Shivsena)घटना अयोग्य आहे, हा दावाच मुळात चुकीचा आहे. शिवसेनेची घटना ही दर पाच वर्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पक्षप्रमुखांपासून ते नेते उपनेते यांची रितसर निवडणूक घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai)यांनी सांगितले. आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ठाकरे गटाचे विविध नेते […]
मुंबई : ‘ गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितलाय पण आधी सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर गद्दार निवडणूक आयोगाकडे गेले. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये गद्दार अपात्र ठरणार असतील तर निवडणूक आयोग त्यांचा पक्षावरील दावा कसं काय गृहीत धरत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी आमची मागणी आहे.’ अशी मागणी आजच्या […]
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर (Shinde group) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विधिमंडळ, संसद आणि रस्त्यावरचा असे पक्षाचे तीन प्रकार सांगितले. तसेच, दुसरी शिवसेना मी मानत नाही, एकच शिवसेना (Shivsena) आहे, असं मी मानतो असंही ते म्हणाले. “गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणाचा, नीचपणाचा […]
औरंगाबाद : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातून देखील निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]