मुंबई : दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या नाकासमोरुन जे प्रकल्प पळवून नेलेत, ते आधी परत आणा, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केलाय. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणं माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. […]
ठाणे : ठाण्यामध्ये ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिच राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅंटिंगही केली. ठाणे शहरात टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही मोठी क्रिकेट स्पर्धा असून यामध्ये अनेक संघ सहभागी झाले आहेत. […]
कोल्हापूर : माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकत कारवाई केली. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे या कारवाईनंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुश्रीफांवर टीका केली. ‘मुश्रीफांनी मला काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाण्यापासून रोखले होते. तसेच आता ईडीने छापा टाकत कारवाई केल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.’ असं देखील सोमय्या […]
अहमदनगर : बीडला निघालेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आले. तेथून ते हेलिकॉप्टरने बीडला गेले. तेथे काही वेळ त्यांनी पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाजूला जाऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की […]
सांगली : राज्यात पदवीधर निवडणुकीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास,विधी व न्याय,वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या परिक्षा आहेत.यामुळे तब्बल १० हजारांहून अधिक ‘पदवीधर’ निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहतील. या मुद्द्याकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहले […]
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षाने माझ्याबाबत घेतलेली भूमिका न्यायाला धरुन नसून चौकशीअंती सत्य समोर येईलच, माझा न्यायावर विश्वास असल्याचं ट्विट सुधीर तांबे यांनी केलंय. दरम्यान, सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर […]