मुंबईः सत्यजित तांबेंच्या (satyjeet tambe) बंडखोरीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh)यांनी तांबेंच्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांना बदलावे, असे पत्रच देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले आहे. पटोले यांच्यावर काही आरोप देशमुख यांनी केले आहेत. […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाविरोधात बंड करून अपक्ष निवडणूक अर्ज भरणारे सत्यजित तांबे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तर आता सत्यजित तांबेंवरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सत्यजित तांबेंवर कारवाई करू शकतात. मात्र यादरम्यान सत्यजित तांबेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटर आणि फेसबुक या आपल्या सोशल मिडीयावरून कॉंग्रेसचा उल्लेख […]
पुणे : ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. सत्यजितचा अर्ज आला. यामागील कारणं स्वतः डॉक्टर चांगले सांगू शकतील. ते 3 टर्मला पदवीधर आमदार होते. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होता. पण घरात त्यांची चर्चा झाली असेल आणि सत्यजितचा […]
मुंबई : नाशिक मतदारसंघात तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाना पटोले म्हणाले, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेससोबत बंड करून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. याचसाठी भाजपचे गिरीश महाजन हे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी नाशिकमध्ये रवाना झाले आहेत. अशातच ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आज सकाळपासून गायब झाल्या होत्या. नाशिकच्या शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यलयात आपली […]
पुणे : भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नवीन चेहरा असू शकणार, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकरिता भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात आहे. तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील प्रयत्नशील असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात, अशी लढत होणार आहे […]