निवडणूक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

  • Written By: Published:
निवडणूक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. अशातच ऐन निवडणुकीच्या (Election) तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठे विधान केलं. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याची शक्यताही आंबेडकर यांनी वर्तवली.

योगेश कदम डोक्यावर बर्फ ठेवून करेक्ट कार्यक्रम करणार ; दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले 

प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सध्याचे राज्यातील राजकारण तत्त्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्वाचं वाटतं, असं आंबेडकर म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

करमाळ्यात ट्वि्स्ट! शिंदेंचा उमेदवार असताना अजितदादांची अपक्षाला साथ? म्हणाले.. 

मु्स्मिम समाजाने सगळीकडे वोट जिहाद सुरू केलाय, आता आपल्यालाही मतांचे धर्मयुद्द करण्याची वेळ आली, या फडणवीसांच्या वक्तव्याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, हे धर्मयुद्ध नाही तर हे पक्षयुध्द नाही. धर्मयुद्ध म्हणायला हे काही हिंदू-मुस्मिम, हिंदू-बौध्द, हिदू-जैन किंवा ख्रिश्चन-बौध्द यांच्यातील युद्ध नाही. हे धर्मयुद्ध आहे असं सांगून सत्ताधारी केवळ आपली पोळी भाजून घेत आहेत. अशी विधान करून ते स्वत:चा पाच वर्षांचा कालखंड लपविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका आंबेडकरांनी केली.

आंबेडकर यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भाजप मतांजे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. माध्यमे वंचितकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यामुळे आगामी काळात वंचितची नेमकी काय भूमिका राहणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube