अजितदादांचा पेपर कॉपी करूनच ताई पास; चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

अजितदादांचा पेपर कॉपी करूनच ताई पास; चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Rupali Chakankar : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) बारामती (Baramati) मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासाठीच अजित पवार बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडून आपण विजयी होऊ, असा दावा केला दात आहे. याच दाव्यावरून आता अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दादांच्या पेपरची कॉपी करून ताई पास झाल्याची टीका चाकणकर यांनी केली आहे.

Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार 

आज रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मागील गेल्या १५ वर्षापासून त्यांच्यासोबत (सुप्रिया सुळे) मतदारसंघात काम केले आहे. तर आता आम्ही पंधरा वर्षांनंतर जनतेचा कौल पाहत असून विकास कामांच्या बाजूने कौल देणारी जनता आहे. या संपूर्ण कालावधीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादांनी मतदारसंघात कामं केली. तो पेपर कॉपी करून सुप्रिया सुळे पास झाल्या आहेत, तसचं बारामतीमधील जनता भावी खासदार म्हणून सुनेत्रा वहिनींच्या चेहऱ्याला मान्यतादेत आहे. हे अनेक कार्यक्रमांतून दिसून येते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेवढ्या जागा लढवल्या जातील, त्या सर्व जागांमध्ये सुनेत्रा पवार सर्वाधिक मतांना निवडून येतील, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.

Earthquake : नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, 1.5 रिश्टर स्केलची नोंद, लोक घराबाहेर 

अजित पवारांनी बारामतीमध्ये झालेल्या नमो रोजगार मेळाव्यात तालुक्याला एक नंबर करण्यासाठी तुमची साथ हवी असे आवाहन बारामतीकरांना केले. त्यावर सुप्रिया सुळेंनी बारामती पहिल्यापासूनच एक नंबर आहे, असे म्हणत अजितदादांना प्रत्युत्तर दिले होते. सुळेंच्या या विधानाचा चाकणकरांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, 90 टक्के घेऊन एक नंबरने पास होणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला आणखी जास्त मार्क पडावेत असे नेहमीच वाटते. त्यामुळे दादांच्या कामाबाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. ती कांमामुळे आणि प्रशासनावर असलेल्या पकडीमुळेच बारामती क्रमांक एकवर असल्याचे चाकणकरांनी सांगितले.

बारामतीत आयोजित नमो रोजगार मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी बारामतीला नंबर एक करण्यासाठी तुमची साथ हवी, असं आवाहन केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर देताना बारामती पहिल्यापासून पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चाकणकरांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, ९० टक्के गुण मिळवून एक नंबरने पास होणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला आणखी जास्त मार्क पडावेत, असं नेहमीच वाटतं.त्यामुळं दादांच्या कामाबाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. दादांच्या कामामुळं आणि प्रशासनावर असलेल्या पकडीमुळं बारातमी क्रमांक एकवर असल्याचं चाकणकर म्हणाल्या.

आधी वरिष्ठांशी चर्चा करा…
दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांना इशारा दिला होता. विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू, असं शिवतारे म्हणाले होते. याविषयी विचारले असता चाकणर म्हणाल्या की, महायुतीत एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी. मग विधाने करावीत. त्यांचे वक्तव्य हे त्यांचं परस्पर मत असतील, महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम करत आहोत, असं चाकणकर म्हणाल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube