आजारी असूनही पवारसाहेबांना फिरवतात; अजितदादांची ‘त्या’ चौकडांवर टोलेबाजी…
Ajit Pawar On Sharad Pawar Group Leader : शरद पवारसाहेब आजारी असूनही बाकीचे आजुबाजूचे चौकड त्यांंना फिरवत असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटातील (Sharad Pawar) नेत्यांवर केलीयं. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patl) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उरळी कांचनमध्ये पार पडली. यावेळी अजित पवारांनी बोलताना शरद पवार गटाच्या नेत्यांवर टोलेबाजी केलीयं.
Rupali Chakankar यांना ईव्हीएमची पूजा भोवली; सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अजित पवार म्हणाले, वरळी कांचनमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. शरद पवार हे माझेही नेते आहेत. प्रत्येकाचा काळ असतो काल ते आजारी होते परवाही त्यांना बोलता येत नव्हतं. 2004 साली असंच झालं होतं. आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रुग्णालयात जा ऑपरेशन करा आम्ही सगळं पाहतो. त्यावर शरद पवार म्हणाले मी जातोयं, सेनापती नाही सैन्याने लढायचं आहे सैन्य लढलं ना…आज एवढी उष्णता आहे आधार दिल्याशिवाय ते चालू शकत नाही आणि हे बाकीचे चौकड आजूबाजूचे साहेबांना सभेला इकडे तिकडे घेऊन जात असल्याची टोलेबाजी अजितदादांनी केलीयं.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
शरद पवार यांच्या आजूबाजूच्या चौकडांना असं फिरवायला काही वाटत नाही. उन्हाची तीव्रता वाढलीयं. धाराशिव की सोलापुरला एका जणाला सनस्ट्रोक झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांना अधिक पाणी पिलं पाहिजे, उन्हात कारण नसताना जाऊ नका, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.
‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर
शपथ विधीला दिलीप वळसे पाटलांचं नाव घेताच गडी बिथरला :
मी कामाचा माणूस आहे, मला उगीचच गप्पा मारायला आवडत नाही . उगीच कोणाला तरी बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही. अशोक पवारांसह इतर सर्वच आमदार माझ्यासोबत चर्चा करीत होते. त्यावेळी सर्वच आमदारांनी खूप चांगला निर्णय असल्याचं म्हणत माझं कौतूक केलं होतं. अशोक पवारांनी अॅफिडिव्हीटवर सही केली, आमच्यासोबतही आले मात्र, शपथविधीला दिलीप वळसे पाटलांचं नाव घेताच गडी बिथरला. दिलीप वळसेंना घेतलेलं मला आवडणार नाही, असं पवार म्हणाले होते, पण तूला मी निवडून आणलंय अन् तू अशा गप्पा मारतो, या शब्दांत अजित पवार यांनी धुतलं.