“अमित शाह बनावट शिवसेनेचे प्रमुख त्यांनी काही जणांना..”, राऊतांचा भाजपसह शिंदेंवर बाण

Sanjay Raut Press Conference : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर (Amit Shah) घणाघाती टीका केली. बनावट शिवसेना शाह यांनी महाराष्ट्रात काही जणांना (एकनाथ शिंदे) चालवायला दिली आहे. त्यामुळे आता त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकाही बनावट वाटणार असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार, भाजप आणि अमित शाहांवर जोरदार टीका केली.
राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेबांचं नाव घेत ज्यांनी एक बनावट शिवसेना तयार केली आहे त्यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांबद्दल बोलूच नये. बाळासाहेबांच्या आवाजाचा प्रयोग आम्ही याआधी मुलुंडमध्ये सुद्धा केला होता. विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं आहे हे भाजपाचेच नेते सांगतात त्यांचं या लोकांनी ऐकलं पाहीजे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तंत्रज्ञानाविषयी आम्ही देश कसा पुढे नेतोय हे सांगितलं होतं. अमित शाह यांनी बनावट शिवसेना निर्माण केली आणि बनावट नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं, असे संजय राऊत म्हणाले.
संपूर्ण देश विकून झाल्यावर.. वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा
त्यांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये
काँग्रेस पक्षातून आलेले शंभूराज देसाई आम्हाला शिकवणार का? बेडकासारखी काँग्रेसमधून शिवसेनेत उडी मारलेले शंभूराज देसाई सांगणार? ते बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था वाईट झालेली नाही. त्यांनी इतिहास वाचावा, गद्दारांना क्षमा नाही. तो खटला काय होता? त्या संजय राऊत यांची भूमिका काय होती? हे जरा या पोकळ शंभूंनी समजून घ्यावं. त्यांचे पक्षप्रमुख अमित शाहा यांनी तंबी दिली आहे. फडणवीस यांची चाकरी करा आणि सरकारमधून दूर व्हा. फार शहाणपणा करू नका. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं आहे इथेच आपण राहूया. भांडी घासून चाकरी करू गुलामी करू. पण बाहेर आता पडता येणार नाही. त्यांनी आम्हाला आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे शिकवू नये अशी टीका संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर केली.
शिवसेनेला धमक्या देऊ नका
तुम्ही लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरला. शिवसेनेला धमक्या अजिबात देऊ नका. अंडरवर्ल्डचे लोक अशाच प्रकारे काम करायचे. माणसं मारायचे माणसांचं अपहरण करायचं. त्याच पद्धतीने ह्या टोळ्या चालवत आहेत. ज्या पक्षाचे प्रमुख अमित शाहा आहेत ते हेच करणार. पक्ष फोडणार, घर फोडणार, दुकान फोडणार. जो पॅटर्न गुजरातमध्ये चालवला तोच महाराष्ट्रात चालवत आहेत अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
शिवसेना फोडून मोदींच्या पायाशी ठेवणे..हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट, संजय राऊतांचा हल्लाबोल