मोदींचा शपथविधी होताच नाराजी उघड; शिंदेंच्या खासदाराकडून मंत्रीपदात दुजाभाव केल्याचा आरोप

मोदींचा शपथविधी होताच नाराजी उघड; शिंदेंच्या खासदाराकडून मंत्रीपदात दुजाभाव केल्याचा आरोप

Srirang Barne : चिराग पासवान यांचे पाच खासदार आहेत. (Srirang Barne) शिवसेनेचे सात खासदार आहेत. जितनराम मांझी हे एकटेच आहेत हे सगळ असताना वरील लोकांना कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाला नाकारलं आहे अशी भावना श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भाजपसाठी अजित पवारांनी कुटुंबासह इतरांशी लढा दिला आहे. (Modi Cabinet) परंतु, त्यांनाही मंत्रिपद मिळाल नसल्याची भावना बारणे यांनी बोलून दाखवली आहे.

भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे   शिंदेंना कुमारस्वामी अन् चिराग भारी; 5 आणि 2 खासदार असतानाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे आहेत. मात्र, त्यांना मंत्रीपद दिलेलं नाही. परंतु, ते तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांनाही मंत्रीपद मिळायला हरकत नव्हती. असंही बारणे म्हणाले आहेत. त्याचबरोबर हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी या विषयावर जास्त बोलण टाळलं. मात्र, आम्हाला अशी का वागणूक दिली गेली यावरून त्यांनी उघड नाराजी व्यक्त करत केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये लक्ष घालावं असं ते म्हणाले आहेत.

कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद

कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनात दल सेक्युलर पक्षाला 2 खासदार असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले, तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी शपथ देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 6 खासदार मंत्री

  • नितीन गडकरी – कॅबिनेट
  • पियुष गोयल – कॅबिनेट
  • प्रतापराव जाधव – राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
  • रामदास आठवले – राज्यमंत्री
  • रक्षा खडसे – राज्यमंत्री
  • मुरलीधर मोहोळ – राज्यमंत्री

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज