चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र

  • Written By: Published:
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र

Uddhav Thackeray : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळळ्याच्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दरम्यान, आज याच घटनेवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

धक्कादायक! केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; बिहारमध्ये नेमकं काय घडलं? 

महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी आमच्यावर टीका करत आहे की, आम्ही राजकारण करत आहोत. पण ते राजकारण करत नसून गजकर्ण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी म्हणत असत की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालंय.. खाजवत बसत आहेत. पण चुकीला माफीला नाही. आज आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच देशाचे प्रवेशद्वार येथे जमला. हे शिवद्रोही सरकार असून या बेकायदा सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया करा, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

VIDE0: हा तर महाराजांचा अवमान; कालिचरण महाराज संतापले, पण वरिष्ठ नेत्यांना दिली क्लीनचिट ! 

पुढ ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का? पण माफी मागतानासुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल- दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी कशासाठी माफी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी मागितली? असा सवाल करत या चुकीला माफी नाही, असं ठाकरे म्हणाले.

हीच का मोदी गॅंरटी?
निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटत होता की, नौदल दिन माझ्या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे. हा कार्यक्रम विलक्षण दिमाखदार होता. पण त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या काळात मोदी सांगत होते, की मोदींची गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी… हात लावीन तिथे माती होईल, असा टोला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube