Uddhav Thackeray : आम्ही ज्यांच्यासोबत त्यांच्यावरच टीका करतो; सामनातील पवारांच्या टिकेवरुन ठाकरेंचं उत्तर
Uddhav Thackeray On Sharad Pawar : विरोधकांच्या इंडिया आघाडीची उद्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीच्या तयारीच्या माहितीसाठी महाविकास आघाडीनं (MVA) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित होते.
Pune : मोहोळ, मुळीक यांची झोप उडणार? PM मोदींचा विजय सोपा केलेल्या नेता लोकसभेला इच्छुक
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जाते. त्यावरुन पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)प्रश्न विचारला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं वैशिष्ट्य आहे की, आम्ही ज्यांच्यासोबत असतो, त्यांच्यावर टीका करत असतो. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो त्यावेळी भाजपवर टीका केली आणि आता राष्ट्रवादीसोबत आहोत तर त्यांच्यावर टीका करत आहोत, अशी मिश्किल टिपणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
‘वंचित’ची ‘इंडिया’ आघाडीत एन्ट्री होणार? काँग्रेससमोरच ठाकरेंनी काय ‘ते’ स्पष्टच सांगितले
यावेळी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)या उत्तरावर शरद पवार यांच्यासह उपस्थित सर्वच नेतेमंडळी हसायला लागले. त्याचवेळी ठाकरेंच्या शेजारी बसलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर ठाकरेंच्या या उत्तरावर हसत हसत हात जोडले.
त्यावर शरद पवार म्हणाले की, मीडियाने आमच्यावर टीका केली तर आम्ही काम करायचं बंद करायचं का? असा सवालही यावेळी उपस्थित केला. तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
त्याचवेळी शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, असा प्रश्न विचारला त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मिश्किलपणे म्हणाले की, हो जातो आणि उद्याच पंतप्रधानपदाची शपथ घेतो. त्यांच्या या उत्तराने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.