पाठीत खंबीर खुपसला, बाप चोरला…’यांना’ अद्दल शिकवायचीच, तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा एल्गार

पाठीत खंबीर खुपसला, बाप चोरला…’यांना’ अद्दल शिकवायचीच, तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा एल्गार

Uddhav Thackeray Sabha for Yashomati Thakur : राज्यात निवडणूक (Assembly Election 2024) जवळ येताच प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते मैदानात आहेत. तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर आहेत. यशोमती ठाकूर यांच्यासाठी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तिवसा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधीकृत उमेदवार ॲड.यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा घेतली आहे.

बारामतीत किती लीड मिळणार? अजितदादांचं विरोधकांना धडकी भरवणारं उत्तर, म्हणाले, ‘शंभर टक्के…’

महाविकास आघाडी बनली आणि सर्व धर्म समभावासोबत हिंदुत्वाची एकजूट बनली. जो जोडतो तोच मोठा होतो, जो तोडतो तो नष्ट होतो. असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. संविधान तोडणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. परवा फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या हातात लाल संविधान आहे. इन्किलाबचा रंग लाल आहे, त्यागाचा रंग भगवा असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी देशावर कलंक लावला आहे, ज्यांनी संविधान तोंडलंय. अशा लोकांना आपल्यांना सबक शिकवायचा आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. संविधान तोडणारे दोन मोठे पक्ष आहेत.

उद्या होणार ‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर, ZEE5 तर्फे मोठी घोषणा

फक्त शिवसेना नाही तर राष्ट्रवादीपण तोडली. पाठीत खंबीर खुपसला, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केलाय. जे तुम्ही केलंय, तेच तुमची लेकरं तुमच्यासोबत करतील, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.कुठे गेला सोयाबीनचा भाव? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला आठ-दहा हजार भाव होता. तुम्हाला कोण पाहिजे महाविकास आघाडी? की ती बिघाडी (महायुती) असा सवाल त्यांनी जाहीर सभेत केला. तुम्ही मागच्या निवडणुकीत आम्हाला खूप साथ दिली. आमची वहिणी वायफळ बोलते, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका केलीय. शेतकऱ्याला जपायचं असेल, संविधान आणि सर्व धर्मसमभावाला जपायचं असेल, तर तुम्हाला तोडफोड करणाऱ्यांना अद्दल घडवावी लागेल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. विरोधक फक्त चोर आहेत. बाप चोरणारे लोक सोनं-चांदीपण चोरतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. तुमची सेवा करायची आहे, म्हणून तुमचा आशीर्वाद हवाय, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यशोमती ताईसाठी मुद्दाम आलोय. सत्ता परत येणार आहे, सत्ता कुठे जाणार? पैशाने रस्त्यावरचा माल विकत घेतला जावू शकतो, माणसं नाही विकत घेवू शकत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, दुर्लक्ष करा. जनता जनार्दन निर्णय घेईल, असं ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. विरोधकांचा असा पराभव करा की पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. यशोमती ठाकूर यांना दुप्पट मताधिक्याने निवडूण आणा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube