महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंना हव्यात 21 जागा अन् 3 महामंडळ…

  • Written By: Published:
महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंना हव्यात 21 जागा अन् 3 महामंडळ…

Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. सध्या महायुतीचे जागावाटप तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप सुरू आहे. या जागावाटपात मित्रपक्षांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशातच आता आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे (Mahayuti) 20 ते 21 जागांची मागणी केली.

NEET PG 2024 परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात याचिका, 4 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी 

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे 21 जागांची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 20 ते 21 जागांची यादी आठवडाभरापूर्वीच सुपूर्द करण्यात आली आहे. यापैकी किमान 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. जागा किती लढणार याची संख्या कमी जास्त होऊ शकते. मात्र, राज्यातील सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून जे 12 आमदार विधान परिषदेवर पाठवले जातात. त्यापैकी एक जागा आरपीआयला मिळावी. याशिवाय 2 ते 3 महामंडळे मिळावीत, अशा विविध मागण्यांची यादी आठवलेंनी भाजप पुढं ठेवल्याचं सांगितलं जातं.

NEET PG 2024 परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात याचिका, 4 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी 

उमरखेड, धारावी, मालाड, चेंबूर आणि वाशीम विधानसभा मतदारसंघ महायुतीने आम्हाला सोडावा, अशी मागणी आठवलेंनी केल्याची माहिती आहे.

महायुतीला 160 जागा
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण नाही. आरपीआय आठवले गट महायुतीसोबतच राहणार आहे. राज्यात महायुतीला 160 जागा मिळतील. लोकसभेला जे नुकसान झाले ते न होता विधानसभेला फायदा मिळेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. तर लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीत दिसून येईल, असंही आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी आमच्यासोबत राहायला हवं. आम्ही तिसऱ्या आघाडीत जाणार नाही. कारण त्या आघाडीचा काहीच उपयोग नाही, असं आठवलेंनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube