Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे

Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे

Vidhansabha Election : अवघ्या काही महिन्यांवर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election) आल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यामध्ये आज घडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कुणाचं सरकार सत्तेत येणार? याचा अंदाज इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मूड ऑफ नेशन’ सर्व्हेमध्ये (India Today-C Voters’ ‘Mood of Nation’ Survey) समोर आला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेनं कौल दिला आहे.

ब्रिजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा हटवली; कुस्तीपट्टू विनेश फोगटचा दावा 

केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच (दि. 16 ऑगस्टला) हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे संकेत आयोगाने दिले आहेत.

मविआला 150 ते 160 जागा मिळणार
दरम्यान, आता इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मूड ऑफ नेशन’ सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहता महायुतीला 42 टक्के तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.

Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? 

सीएम शिंदेंना 3.1 टक्के लोकांची पसंती
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.71 टक्के, तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा या सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय मविआला 150 ते 160 जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात मविआची सत्ता येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये केवळ 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे.

टाइम्स-MATRIZE सर्व्हे काय सांगतो?
काहीच दिवसांपूर्वी टाइम्स-MATRIZE चा सर्व्हे प्रकाशित झाला. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला 95 ते 105 जागा मिळू शकतात. सीएम शिंदेंच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 ते 12 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube