जगदीश मुळीकांची नाराजी उघड.. सुरेंद्र पठारेंच स्वागतही केलं नाही…
पठारे यांच्या प्रवेशासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय मात्र मुळीक यांच्याकडून कुठलीच भूमिका घेण्यात आली नव्हती.
Jagdish Mulik Post For Narayan Galande : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील इतर पक्षातील तब्बल २२ जणांना भाजपने पक्षात प्रवेश देत राजकीय भूकंप घडवून आणला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. मात्र या प्रवेशाने भाजपमधीलच काही मंडळी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांसह अनेकांनी हाती घेतलं कमळ
वडगाव शेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे (शरद पवार ) आमदार बापु पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) आणि,राष्ट्रवादीचे नारायण गलांडे यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी फेसबुक पोस्ट करत प्रवेश केलेल्या नारायण गलांडे यांचा फोटो शेअर करत स्वागत केलं मात्र, याच मतदारसंघातील महत्त्वाचं नाव असलेले सुरेंद्र पठारे यांच्या नावाचा साधा उल्लेखही केलेला नाही. यामुळे अनेकांच्या उंचावल्या आहेत.
मुळीकांच्या पोस्टमध्ये सुरेंद्र पठारेंचं नावचं नाही
जगदीश मुळीक यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत नारायण गलांडे तसेच इतर सर्वांचे सहर्ष स्वागत. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत त्यांनी घेतलेला हा निर्णय संघटन बळकट करणारा ठरेल, असा विश्वास आहे. अस म्हणत पठारेंच नावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे.
दरम्यान, नारायण गलांडे हे जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांच्या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांचा त्या प्रभागात प्रभाव असल्याने मुळीकांचा त्यांच्या प्रवेशासाठी आग्रह होता. तर दुसरीकडे सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशासाठी मुळीक फारसे उत्सुक नव्हते शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजकडूनही काही मंडळींचा त्यांना विरोध होता. मात्र पठारेंकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही झाला मात्र, अखेर त्यांना आज प्रवेश देण्यात आला आहे.
पठारे यांच्या प्रवेशासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय मात्र मुळीक यांच्याकडून कुठलीच भूमिका घेण्यात आली नव्हती. आज संघटन बळकटीसाठी पठारेंना प्रवेश दिला असला तरी भविष्यातील राजकारणाचा विचार केला तर असता सुरेंद्र हे जगदीश मुळीक यांनाच अडसर ठरू शकतात. याचं कारण म्हणजे बापू पठारांचे राजकीय वारसदार म्हणून सुरेंद्र यांच्याकडे पाहिले जाते नेमक हेच दुखणं जगदीश मुळीक यांच आहे. त्यामुळे ते या प्रवेशावर नाराज असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसून येत आहे.
दरम्यान, याआधी देखील भाजप आमदारांनी होत असलेल्या प्रवेशांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये हडपसमध्ये आमदार योगेश टिळेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती तर काही दिवसांपूर्वी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रवेशावरून आमदार भीमराव तापकीर यांची मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत तू तू मै मै झाली होती मात्र त्यांनाही आज प्रवेश देण्यात आला आहे. आता मुळीक आगामी काळात सुरेंद्र पठारेंसोबत कस जुळवून घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात ऑपरेशन ‘लोटस’, आमदार पुत्र सुरेंद्र पठारे भाजपवासी, पण का? समजून घ्या राजकारण
आज प्रवेश झालेले २२ जण कोण?
आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 22 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही दिग्गजांचा देखील समावेश आहे. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, सायली रमेश वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी ढोले, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, अनिल तुपे, इंदिरा तुपे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे मुळशीमधील भानुदास पानसरे, गणेश पानसरे, संतोष पानसरे, कृष्णकुमार पानसरे, आनंद माझिरे, सुहास पानसरे, किरण साठे आणि सचिन पानसरे यांचा समावेश आहे.
