उशिरा का होईना बहीण आठवली; ‘लाडकी बहीण योजने’वरुन सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

उशिरा का होईना बहीण आठवली; ‘लाडकी बहीण योजने’वरुन सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

Supriya Sule On Ajit Pawar : उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, आषाढीनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी पालखीच दर्शन घेतलं. यावेळी सुळे यांनी माध्यमांंशी संवाद साधला.

खेळाडू रडले अन् विराटची लेक म्हणाली…; टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट

सुप्रिया सुळे म्हणाल्या, उशिरा का होईना आता त्यांना भाऊ बहीण आठवायला लागले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यावर आम्ही सध्या अभ्यास करीत असून अभ्यास केल्याशिवाय त्यावर काही बोलू शकत नाही. पुढील तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये सरकारकडून जुमल्यांचा पाऊस अपेक्षितच होता, त्यामुळे आश्चर्य वाटत नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय.

‘आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ…’; नाना पटोलेंचा खोचक टोला

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजनांची घोषणा केलीयं. यापैकी एक म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून अनेक टिका-टिप्पणी होत आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, वारकरी संप्रदाय सातत्याने आपले संस्काराची जाणीव ठेऊन सर्वच जण नियोजनपद्धतीने चालतात त्याबद्दल त्यांचे आभार. आता
तीन महिन्यावर निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय काय देईल, यावर आणखीन जुमला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट

राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ते बीड संरपंचाचा खूनाची घटना घडलीयं. हे राज्याच्या गृह मंत्रालयाचं अपयश असून हे दुर्देव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलंय. दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत राज्यातील सर्वच भागात पाऊस पडू देत, आणि आमच्या बळीराजाला न्याय मिळू दे, अशी प्रार्थना केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज