अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

  • Written By: Published:
अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

RSS mouthpiece organizer attacks on BJP leadership!:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाल एनडीएचे (NDA) सरकार स्थापन झाले असून, खाते वाटपही झाले आहे. आता मंत्री कामाला लागले आहेत. परंतु भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, याची चर्चा होत आहे. आता भाजपला घटकपक्षांची मदत घ्यावी लागली आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजप नेतृत्वाचे कान टोचले आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असे निरीक्षणही नागपूरमधील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी नोंदविले आहे. तर आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाइजरनेही भाजपच्या बॅफफूटला जाण्याच्या कारणांवर सविस्तरपणे एक लेख लिहित भाजप नेतृत्वाला आरासा दाखविला आहे. भाजपला अतिआत्मविश्वास नडला, असे स्पष्टपणे लेखात म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या 39 पैकी 30 आमदारांचा ‘शून्य’ उपयोग : अजितदादांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ

पोस्टर आणि सेल्फी शेअर करून लक्ष्य गाठता येत नाही
आरएसएसचे रतन शारदा यांनी आपल्या लेखात भाजपच्या चारशेपार जागांचा उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आपल्या कामकाजात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कारण ही निवडणूक अतिआत्मविश्वास असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी एक रियालिटी चेक आहे. कारण एखादे लक्ष्य हे मैदानावर मेहनत करून गाठले जाते. सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून हे लक्ष्य गाठता येत नाही. भाजप कार्यकर्ते हे हवेत होते. तर विजय आमचाच होईल, असे मोदी यांनाही वाटत होते.

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; एसटीच्या 5 हजार गाड्या अन् ग्रुप बुकिंगसाठी थेट दारातून पंढरपुरला गाडी

मोदी सर्व जागांवर लढतात ही धारणाच चुकीची

सर्व 543 जागांवर मोदी हे लढत होते, अशी धारणा करण्यात आली होती. हा विचार आत्मघाती ठरला. तर स्थानिक नेत्यांना महत्त्व देण्यात आले नाही. पक्ष बदलणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांना तिकीट दिले गेले नाही. त्यांचा बळी घेतला. हे नुकसानकारक ठरले. स्थानिक मुद्दे, उमेदवारांचा ट्र्रॅक रेकॉर्ड पाहणे आवश्यक होते. तर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचाही फटका बसला, असे लेखात म्हटले आहे.


अजित पवारांना का बरोबर घेतले?

लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर टिप्पणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनावश्यक राजकारणाची गरज नव्हती. ते टाळले गेले असते. भाजप आणि शिंदे गट असे बहुमत असताना अजित पवार यांना सत्तेत का घेण्यात आले. शरद पवार हे दोन-तीन वर्षांत गायब झाले असते. कारण एनसीपीमधील चुलत भाई-बहिणींच्या वादात ते आपली ताकद संपवून बसले असते. तरीही चुकीचे पाऊल का उचलले गेले, असा सवाल उपस्थित करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढले आहेत. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने त्रास दिला. अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपने आपली किंमत करून घेतली. राज्यात नंबर बनविण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. परंतु एका झटकात राज्यात आणखी राजकीय पक्ष निर्माण करण्यात हातभार लावला, असेही लेखात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube