रोहित पवारांना पत्रकार परिषदेतील ‘खेकडा’ भोवणार ? पेटा इंडियाकडून तक्रार
PETA India organistion complaint about Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Sharadchandr Pawar Party) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. सावंत यांनी सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचे दाखविताना रोहित पवार यांनी एक जिवंत खेकडा पत्रकार परिषदेत दाखविला होता. त्यावरून आता पेटा इंडिया (PETA India) आक्रमक झाली आहे. या प्रकरणी रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पेटा इंडियाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. तर याबाबत शरद पवार यांनाही पत्र देण्यात आले आहे.
पुन्हा राजकीय भूकंप! धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर ‘तुतारी’ फुंकणार?
तसेच भाजपच्या श्वेता शालिनी यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुद्दा मांडण्यासाठी बांधलेल्या, धडपडणाऱ्या खेकड्याला लटकवले होते. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडिया या प्रकरणे पत्र काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोविंद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल काळसकर यांना हे पत्र देण्यात आले. प्राण्यांचा हा गैरवापर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे उल्लंघन करतो. निवडणूक प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता नियमावलीनुसार रोहित पवारांवर कारवाई करावी. तसेच आमदार रोहित पवार यांनी आपल्याकडील खेकडे पशुवैद्यकीय काळजी आणि पूनर्वसनासाठी पुन्हा निसर्गात सुपूर्द करावेत अशी विनंती केली आहे.
महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातलं सर्वांत मोठं वसुली सरकार; फडणवीसांची सडकून टीका
PETA इंडिया ॲडव्होकेसी असोसिएट शौर्य अग्रवाल लिहितात, रोहित पवार यांनी खेकड्याचा वापर पूर्वनियोजित केला होता हे व्हिडिओवरून स्पष्ट होते. मीडिया स्टंटसाठी, प्राण्याला अनावश्यक वेदना आणि त्रास झाला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की खेकडे बुद्धिमान व्यक्ती आहेत ज्यांना वेदना आणि त्रास होऊ शकतो. ते त्यांच्या सभोवतालचे वातावरण शोधतात, त्यांच्या चांगल्या आठवणी असतात आणि एकमेकांशी संवाद साधतात.