पुण्यात राडा! कार्यक्रमाआधीच पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे गायक हनी सिंगच्या कार्यक्रमाआधीच मोठा राडा झाला आहे. शोच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. शहरातील खराडी परिसरात ही घटना घडली. प्रसिद्ध गायक हनी सिंग याचा लाईव्ह कॉन्सर्ट खराडीत होत आहे. हनी सिंगची लोकप्रियता पाहता मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचे नियोजन तोकडे पडले. गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला. या गर्दीला आवरताना पोलीस हतबल झाले. नंतर गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत युवकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
खराडी परिसरात सिंगर हनी सिंगच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त होती. त्यामुळे या गर्दीचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. व्हिडिओत हे स्पष्ट दिसत आहे. गर्दीला आवरणे पोलिसांना शक्य होत नाही. या ठिकाणी काही बाऊन्सर्सही तैनात होते.
पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी
आतमध्ये हनी सिंगचा आवाज येत होता. दुसरीकडे पोलीस प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी नियोजन करत होते. लोकांना आत जाण्यासाठी दरवाजा उघडण्यात आला. बाहेरील गर्दीचा मोठा लोंढा आत येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. गर्दी खूप जास्त होती. त्यामुळे पोलिसांची पुरती दमछाक झाली. गर्दीवर नियंत्रण मिळवणं त्यांच्यासाठी अशक्य झालं. यानंतर मात्र गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, हनी सिंगचा देशात आणि विदेशात मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या लाईव्ह कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. हनी सिंगची एक झलक पाहण्यासाठी लोक त्याच्या कार्यक्रमांना गर्दी करत असतात. आज हनी सिंगचा कॉन्सर्ट पुण्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु, गर्दी जास्त वाढल्याने कार्यक्रमाचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.
पुनित बालन ग्रुपचा पुढाकार! ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाखांची देणगी