शिरुरचे दोन्ही उमेदवार शिवनेरीवर; आढळरावांना पाहताच कोल्हे पाया पडले…

शिरुरचे दोन्ही उमेदवार शिवनेरीवर; आढळरावांना पाहताच कोल्हे पाया पडले…

Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना आज शिवनेरी गडावर आढळराव आणि अमोल कोल्हे आमने-सामने आले होते. यावेळी आढळरावांना पाहताच अमोल कोल्हे पाया पडल्याचं दिसून आलं आहे.

रणजितसिंह निंबाळकरांचा एककलमी कार्यक्रम; माढ्याचा उमेदवार बदला, कार्यकर्त्यांच्या हट्टानं अजितदादा पेचात

आढळराव पाटील हे शिंदे गटात होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करुन शिरुरच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार म्हणून बाजी मारली आहे. तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. मंचरमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाच्या सभेत आढळरावांसह अजित पवार यांनी अमोल कोल्हेंसह शरद पवार गटावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर अमोल कोल्हेंनीही अजितदादांसह आढळरावांना प्रत्युत्तर दिलं होतं.

Hras : पारंपारिक कला सादर करणाऱ्या भटक्या समाजाची व्यथा; ‘ऱ्हास’ला राष्ट्रीय पुरस्कार

एकूणच या घडामोडीनंतर आज दोन्ही उमेदवार आमने सामने पाहायला मिळाले आहे. माध्यमांशी बोलताना वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती असल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलं तर आढळरावांना नमस्कार करुन मी संस्कृती जपल्याचंही कोल्हेंनी सांगितलं आहे. शिवनेरी गडावर नतमस्तक होत लढण्यासाठी ताकद देण्याचं मागणं कोल्हेंनी मागितलं आहे.

आढळरावांनी टिंगल केली नसती तर…
एक जरी वारी आढळरावांनी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असत. तसेच आक्रोश मोर्चाची त्यांची टिंगल त्यांनी केली नसती तर बरं वाटलं असत. धोरणात्मक टीका व्हायला हवी, वैयक्तिक टीका, व्यावसायिक कामाविषयी टीका करणार नाही, पण धोरणात्मक टीका होणार आहे, समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू, असं आव्हान अमोल कोल्हे यांनी आढळरावांना दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज