थोडी खुशी, थोडा गम! सामना जिंकून न्यूझीलंडच्या खेळाडूला विजयी निरोप

थोडी खुशी, थोडा गम! सामना जिंकून न्यूझीलंडच्या खेळाडूला विजयी निरोप

England vs New Zealand : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा (England vs New Zeland) सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ४२३ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज टीम साऊदीची (Tim Southee) क्रिकेट कारकिर्द आटोपली. या सामन्यात साऊदीला विजयी निरोप देण्यात आला.

टीम साऊदीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा आधीच केली होती. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर साऊदी निवृत्ती घेणार होता. या पद्धतीने तिसरा सामना साऊदीच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. परंतु, त्यांना मालिका काही जिंकता आली नाही. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला.

कसोटीत टी 20 स्टाईल विजय; धुवाधार फलंदाजी करत इंग्लंडने सामना जिंकला, न्यूझीलंड पराभूत

इंग्लंडने 2-1 फरकाने मालिका जिंकली

या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने आठ विकेट्सने जिंकला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ३२३ धावांनी विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने ६५८ धावांचे आव्हान इंग्लंडला दिले होते. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे इंग्लंडच्या फलंदाजांना शक्य झाले नाही. इंग्लंडचा संघ २३४ धावाच करू शकला.

तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा दबदबा

तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डाव्यात ३४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला फक्त १४७ धावाच करता आल्या. न्यूझीलंडला आघाडी मिळाली. पहिल्या डावात हेनरीने ४ तर सँटनरने ३ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने ४५३ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये केन विलियमसनच्या शतकी खेळीचे मोठे योगदान राहिले. केन विलियमसनने २० चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १५६ धावा केल्या.

India vs Australia कसोटी सामन्याचा तिसरा दिवस, पावसामुळे खेळ थांबला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube