ऑस्ट्रेलियाला नमवत भारताच्या वाघिणींची फायनलमध्ये धडक! विजयाची शिल्पकार जेमिमा रोड्रिग्जला अश्रू अनावर

ICC Women’s World Cup 2025 च्या सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी करत बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवला आहे.

ICC Women’s World Cup 2025

India enter finals after defeating Australia in ICC Women’s World Cup 2025 Jemimah Rodrigues Emotional : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी करत बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवला आहे. या ऐतिहासिक विजयाची नायिका ठरली आहे ती जेमिमा रोड्रिग्ज. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 339 धावांना लक्ष करत भारतीय महिलांनी 9 बॉल आणि पाच गडी राखून हा दणदणीत विजय मिळवला आहे.

‘या’ राशीसमोर समस्येचा डोंगर तुमच्या राशीचे काय? जाणून घ्या आजचं राशिभविष्य…

तर जेमिमाने तिच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी करत 127 धावांची नाबाद शतकी खेळी केली. सुरुवातीला भारताने काही घडी जलद गमावले होते. पण करणार आणि जिमी यांनी संघाला स्थिरता आणली. यामध्ये हरमनप्रीत कौरने 89 धावा करत महत्त्वाची भागीदारी केली. तर जेमिमाने शेवटपर्यंत लढत भारताचा विजय खेचून आणला. या विजयी क्षणानंतर जेमीमा भावनिक झाली होती. मैदानातच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी सर्व सहकाऱ्यांनी हा विजय साजरा केला.

मोठी बातमी : बच्चू कडूंसमोर सरकार झुकले ? कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन

दरम्यान जेमिमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. तसेच गेल्याच वर्षी पुरुष वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं होतं ज्याचा हा बदला घेतला गेल्याचं सोशल मीडियावर सध्या बोलले जात आहे. तर गेल्या आठ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया देखील पहिल्यांदाच विश्वचषकातील सामना हरला आहे.

मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी, चाटूगिरी…राज ठाकरेंचा शिंदेंवर पहिल्याच ‘वार’

आता रविवारी भारताचा अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेची सामना होणार आहे. हा सामना दोन नोव्हेंबरला मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग करत मिळवलेला विजय आहे. हा विक्रम अगोदर ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांच्याच विरोधात खेळत असताना भारताने 131 धावांचं लक्ष पार करत हा रेकॉर्ड बनवला आहे.

follow us