नवी दिल्ली : फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. पेले यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते, त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ट्रेस कोराकोस येथे झाला. हे दक्षिणपूर्व ब्राझीलमधील एक शहर आहे. तीन वेळा विश्वचषक विजेते पेले यांना काही दिवसांपासून प्रकृतीचा त्रास […]
नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. यानंतर 10 ते 15 जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट निवड समितीने आगामी मालिकेसाठी २० सदस्यीय संघाची निवड केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी बुधवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 20 सदस्यीय संघाची घोषणा […]
मेलबर्न : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबत बरेच विक्रम त्याने नावावर केले आहेत. 200 धावा केल्यानंतर त्याला हाताच्या दुखण्यामुळे मैदान सोडावे लागले होते, त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. […]
मेलबर्नः ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅमरून ग्रीनवर आयपीएलमध्ये तब्बल 17 कोटी 50 लाखांची बोली लागली होती. त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. त्याच्यावर मोठी बोली का लागली ते आज दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यातून समोर आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आफ्रिकेचा संघ अवघ्या 189 धावांत गारद झाला. आफ्रिकेचे फंलदाज ग्रीनसमोर खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. ग्रीनने […]
ब्राझील : फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांना ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला आणि फुटबॉलमध्ये पेले यांना देव म्हटले जाते. सध्या हाच फुटबॉलचा जादूगार पेले कर्करोगाशी लढा देत आहे. त्यांची प्रकृती नाजूक झाल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावर साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल […]
नवी दिल्ली : भारतीय संघाने बांगलादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करून आपले नाव कोरले आहे. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर – आर अश्विनने समंजस फलंदाजी करत सामना बांगलादेशच्या मुठीतून हिसकावून घेतला. दोन्ही फलंदाजांनी भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत हा विजय मिळवून दिला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची अवस्था […]