मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीनं चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना […]
मुंबई : दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 […]
राजकोट : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यातील पहिल्याच षटकात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटनं हॅटट्रिक घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेता आली नाही. अशी कामगिरी करणारा जयदेव उनाडकट पहिलाच गोलंदाज ठरलाय. दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यात रणजी ट्रॉफीतील गट सामना खेळला जातोय. या सामन्यात दिल्लीच्या […]
नवी दिल्ली : नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघ पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. कर्णधार रोहित शर्मा अनफिट आहे, त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आली आहे. रोहित व्यतिरिक्त, विराट कोहली आणि केएल राहुल देखील टी-20 मालिकेत दिसणार […]
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत होत आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. 2023 मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशा स्थितीत भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-20 सामन्यांची मालिका खेळवली […]
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाला 2023 च्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची माहिती आयसीसीने ट्विटरवरुन दिली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता, तर नुकताच न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. यानंतर पाकिस्तान […]