Under 19 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानशी सामना नाहीच; भारत ‘या’ दिवशी सुरु करणार मोहीम
Under 19 World Cup 2026 Schedule : आयसीसीने आज 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Under 19 World Cup 2026 Schedule : आयसीसीने आज 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून एकूण 41 सामने होणार आहे.
तर या स्पर्धेचा अंतिम सामना हरारे झिम्बाब्वे (Under 19 World Cup 2026 Schedule) येथे होणार आहे. आयसीसीने 16 संघाना प्रत्येकी चार संघांच्या गटात विभागले आहे. ग्रुप सामन्यानंतर सुपर सिक्स स्टेजनंतर सेमीफायनल आणि फायनल असा या स्पर्धेचा फॉर्मेंट असणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि अमेरिकामध्ये होणार आहे.
ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ (Team India) अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंडशी भिडणार आहे मात्र या ग्रुपमध्ये पाकिस्तान नसल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये ग्रुप सामना होणार नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना सुपर सिक्स स्टेजमध्ये होण्याची शक्यता आहे.
The countdown begins ⏲️
The fixtures for the Men’s #U19WorldCup 2026 have been announced 🗓️https://t.co/IJwCu5nIwY
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 19, 2025
कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये आहे?
ग्रुप अ: भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड
ग्रुप ब: झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड
ग्रुप क: ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान आणि श्रीलंका
ग्रुप ड: टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका
घरमालकांनो…, भाडेकराराचे नियम बदलले, एक चूक अन् भरावा लागणार 5000 रुपये दंड; जाणून घ्या सर्वकाही
भारताचे वेळापत्रक
15 ते 24 जानेवारी दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने होतील. 15 जानेवारी रोजी भारताचा सामना अमेरिकेशी होईल. त्यानंतर 17 जानेवारी रोजी बांगलादेशशी आणि 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडशी होईल. सुपर 6 स्टेज 24 जानेवारी रोजी सुरू होईल.
