तरूणांमध्ये क्रेझ असलेली ‘दाढी’ ठरली निवृत्तीचं कारण; युवराज सिंगच्या पार्टीत कोहलीनं उघड केलं गुपित

Virat Kohli on Retirement : क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) मे महिन्यात अचानक कसोटी क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्या या निर्णयाचे क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटले होते. दरम्यान, कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना विराटने कोणतेही कारण सांगितले नव्हते. मात्र, काल लंडनमधील एका कार्यक्रमात त्याने त्यामागील कारण सांगितले.
संघाचा माणूस असल्याने अध्यक्षपद ? नरेंद्र जाधवांनी मोठा खुलासा करत सगळं सांगितलं
युवराज सिंगने यूवीकैन फाउंडेशनसाठी (YouWeCan Foundation) निधी उभारण्यासाठी लंडनमध्ये एका भव्य डिनर पार्टीचे आयोजन केले होते. त्यात विराटसह अनेक मोठे आजी-माजी क्रिकेटपटू सहभागी झाले होते. जेवणानंतरचे सत्र गौरव कपूरने होस्ट केले. यात रवी शास्त्री, युवराज सिंग, केविन पीटरसन, क्रिस गेल आणि डॅरेन गॉफ यांनी भाग घेतला होता. सुरुवातीला विराट कोहली स्टेजवर नव्हता, परंतु गौरवच्या वारंवार विनंतीवरून तो देखील स्टेजवर आला. यावेळी गौरव कपूरने विराट कोहलीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला.
आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही…
गौरवने विचारलं की सर्वजण तुला मैदानात मिस करत आहेत. तेव्हा विराटने निवृत्तीबद्दल मौन सोडलं. तो म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वीच माझ्या दाढीला कलर केलं. दर चार दिवसांनी जेव्हा तुम्हाला दाढीला कलर करावं लागतं, तेव्हा निवृत्तीची वेळ जवळ आलीय, असं समजायाचं, असं विराट म्हणाला. त्याने कसोटीतून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचं सांगितलं.
विराट ३६ वर्षांचा असून त्याने १२ मे २०२५ रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली होती.
रवी शास्त्रींविषयी विराट काय म्हणाला?
यावेळी विराट कोहलीने त्याचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींनाही उजाळा दिला. तो म्हणाला, जर रवी शास्त्री माझ्यासोबत नसते तर कसोटी क्रिकेटमध्ये मी जे काही साध्य केले ते शक्य झालं नसते. माझ्या मनात कायम त्यांच्या प्रती प्रेम आणि सन्मान असेल. माझ्या क्रिकेट कारकीर्दमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
युवी पाजी सोबत माझे खास नाते : विराट
या कार्यक्रमात विराट कोहली युवराज सिंगविषयी बोलताना म्हणाला की, मैदानाच्या आत आणि बाहेर आमचे दोघांचेही खूप चांगले संबंध होते… मी पहिल्यांदा युवी पाजीला बंगळुरूमध्ये नॉर्थ झोन स्पर्धेत पाहिले होते. जेव्हा मी टीम इंडियामध्ये आलो तेव्हा त्यांनी, भज्जी पाजी आणि झहीर भाईंनी मला खूप सांभाळून घेतलं.
दरम्यान, या कार्यक्रमाला विराट कोहली व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, आशिष नेहरा असे इतरही दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.
कोहलीने १२३ कसोटी सामने खेळले
कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये (२१० डावांमध्ये) ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. यात ३० शतके आणि ३१ अर्धशतके आहेत. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे आणि ४० विजय मिळवले. त्यामुळे तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे.