Ajit Pawar News : आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून कार्यकर्त्यांना जबरदस्त तंबीच देण्यात आली आहे. पोलिसांकडून मला समजलं की आपल्याच कार्यकर्त्यांची चूक, तर पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन, अशी तंबीच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 18 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित […]
Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात आल्याचा निर्णय गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र शरद […]
मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना […]
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]
Vishwajeet Kadam : राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून मोठे राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar)बंडानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात एकच […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर खासदार शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पुण्यात होते. […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) प्रचार प्रमुख म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुण्यातील युवा मिशन कार्यक्रमात ही घोषणा केली. धनंजय मुंडे यांना राज्यातील एक तरुण, आक्रमक नेते आणि मुलुख […]