मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने त्याग करावा असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही.
जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम 100 टक्के फूलप्रूफ आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी सांगितले.
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.
निवडणुकीआधी महायुती सरकारने फक्त दहा दिवसांच्या काळात तब्बल 1 हजार 291 निर्णय घेतले आहेत.
महायुती सरकारने सरकारी योजनांच्या डिजीटल प्रसिद्धीसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचे पाच दिवसांचे टेंडर काढले आहे.