- Home »
- NCP
NCP
बारामतीत नणंद-भावजयमध्येच फाईट; सुळेंच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
अजितदादांचे खास प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा; 840 कोटींप्रकरणात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून […]
लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजप-शिवसेनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली (S. R. Kohli) यांनी जाहीर केली […]
निलेश लंकेंची यांची रोज नवीन गुगली, पवारांशी बोलणे नाही…पण त्यांनाच विचारणार
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके […]
मंत्री दिलीप वळसे पाटलांचा हात फ्रॅक्चर; पु्ण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
Pune News : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी बातमी आली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) आज त्यांच्याच घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खु्ब्याला मार लागला आहे. हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]
शिरुरचे दोन्ही उमेदवार शिवनेरीवर; आढळरावांना पाहताच कोल्हे पाया पडले…
Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना […]
ठाकरे अन् काँग्रेसवर शरद पवारांची नाराजी : पक्षनेत्यांनीही केली तक्रार
मुंबई : स्वतंत्रपणे जागा जाहीर केल्याने आणि वाद असूनही सांगलीच्या (Sangli) जागेवर उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) मुंबईतील पक्ष कार्यालयात तब्बल साडेतीन तास झालेल्या बैठकीत नाराजी बोलून दाखवली असल्याचे […]
विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले
मुंबई : अखेर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शिवतारे यांच्यासोबत मध्यरात्री बैठक पार पडली. त्यानंतर चौघांचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार […]
सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली…
Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजायला सुरुवात झाली असून येथे काही दिवसांमध्ये त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया देखील पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikeh) यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या बालेकिल्ल्यात जात त्यांच्यावर नाव न […]
साताऱ्याची जागा आमचीच, भाजप नेते ‘त्यांची’ समजूत काढतील : अजितदादांकडून उदयनराजेंच्या आनंदावर विरजण
सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा […]