Video : विधानसभेपूर्वीच पवारांकडून राज्यात सत्ता स्थापन; मुंबईतील दाव्यामुळे राजकीय भूकंप होणार?

Video : विधानसभेपूर्वीच पवारांकडून राज्यात सत्ता स्थापन; मुंबईतील दाव्यामुळे राजकीय भूकंप होणार?

Sharad Pawar News : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलायं. यावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने थेट विजयाचा आकडाच जाहीर केलायं. शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीयं.

Emraan Hashmi: इमरानने अखेर मौन सोडले; सीरियल किसरच्या प्रतिमेवर पहिल्यांदाच केले भाष्य

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालंय. राष्ट्रवादी पक्षाने लोकसभेत दहा जागांवर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे. याचा अर्थ असा की ही तर सुरुवात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 235 जागा निवडून येणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलायं.

Indian 2: कमल हसनचा ‘इंडियन 2’ चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी

तसेच सध्या महाराष्ट्राचं राजकारण पाहता ते बदलण्याची वेळ आलीयं. राजकारणाची ही परिस्थिती बदलण्याची आपण सर्व लोकांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी असून आपलं राज्य आणून त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कसा फरक होईल याची काळजी आपण घेऊयात…राज्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, कर्मचाऱ्यांसह सर्वच जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन एक सक्षम सरकार स्थापन करण्याचा संकल्प करु, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी केलायं.

विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, कॉंग्रेसचा विचार…; सत्यजित तांबेंचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला 18 जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने अवघ्या दहाच जागा जिंकून दहापैकी आठ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला मतदारांनी चांगलीच पसंती दिली असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा करिश्मा होणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज