ज्यूनियर क्रिकेट समितीने 24 जून ते 23 जुलै 2025 दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघाची निवड करण्यात आली आहे.
जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम मधील वॉल ऑफ ग्लोरीमधून सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले आहेत.
कसोटी क्रिकेटचे सामने लहान मुलांना फ्री मध्ये पाहता येतील. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
आताही एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. बीसीसीआय विराटला पुन्हा कर्णधार करण्याच्या विचारात होतं पण ऐनवेळी हा विचार सोडून देण्यात आला.
WTC Final Prize Money 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या बक्षीसाच्या रकमेची (World Test Championship) घोषणा झाली आहे. फायनल सामना 11 ते 15 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यावेळी विजेता होणाऱ्या संघासाठी बक्षिसाच्या रकमेची घोषणा झाली आहे. यावेळची रक्कम मागील वेळच्या तुलनेत 125 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेत […]
2025-26 या वर्षात टीम इंडियाला काही वनडे सीरीज खेळायच्या आहेत. या मालिकेत रोहित आणि विराट कधी खेळताना दिसतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता.
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.
बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू इच्छित नाही असे या पत्रात म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि सध्या टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.