महाराष्ट्र अन् मराठीला हिंदीपासून धोका नाही तर..राऊतांचा राज ठाकरेंसह मोदी, शाहंवरही वार

Sanjay Raut on Compulsory Hindi Language : मराठी आणि हिंदी यावरून सुरू असलेल्या विषयात संजय राऊतांनी थेट घाव केले आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि मराठीला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका आहे (Language) असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा टोला लगावत राज्यातील भाजप युती सरकारला डिवचलं आहे.
संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठीविषयी टिप्पणी केली होती. त्यांनी मुंबईतील विविध भागात वेगवेगळी भाषिक गट असल्याचं म्हटले होतं. त्यानंतर आता हिंदीचे सक्तीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसे आणि उद्धव ठाकरे गटात मराठीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता पुन्हा एकदा निशाणा साधला.
धोका गुजरातीपासून
मुंबईत मराठी पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नसल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका कुणापासून असेल तर हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून आहे, असा दावा राऊत यांनी पत्र परिषदेत केला. लक्षात घ्या मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे, असे त्यांनी पुन्हा सांगितले.
हे ठरवणारे राज ठाकरे कोण?, आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं म्हणत बच्चू कडू भडकले
संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्यात आल्याचा घणाघात त्यांनी घातला. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्याच्यावर कोणीच काही बोलत नसल्याचा थेट आरोप राऊतांनी केला. या मुद्दावर कॅफेत चर्चा होत आहे का? असा खोचक टोलाही त्यांनी मनसेला लगावला. राज ठाकरे शहा मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात. शिंदे आणि त्यांची टोळी कोणत्या भाषेत शहा, मोदींशी बोलतात. ज्यांचे इंग्रजीचे वांदे आहेत, त्यांना हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मराठी ही आई आहे तर इतर भाषा मावश्या असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
हिंदी सक्तीचे शैक्षणीक धोरणा पुरते मर्यादित आहे. परंतु, हा वाद पालिका निवडणुकीसाठी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात तेंव्हा हे का बोलत नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाषेची सक्ती करायाची नाही, दक्षिणेतील राज्यकर्ते हे कटवट आहे. परंतु, आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.