Video : ‘त्या’ व्यक्तीचं नाव, पत्ता मला पाठवा काम झालचं समजा; मोदींचं अकोल्यात मोठं आश्वासन

  • Written By: Published:
Narendra Modi

अकोला : विधानसभेसाठी राज्यात प्रत्येक पक्षाकडून प्रचारसभांचा धडाका सुरू असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील (Narendra Modi) महाराष्ट्रात विजयासाठी कंबर कसली आहे. काल (दि. 9) धुळे आणि नासिकमध्ये मोदींच्या सभा पार पडल्यानंतर आज (दि.9) मोदी अकोल्यात दाखल झाले आहे. यावेळी बोलताना मोदींनी अकोल्यातील लाखो मतदारांना मोठं आश्वासन दिले आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (Narendra Modi Speech In AKola)

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? अमित शाहांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया, म्हणाले, “निवडणुकीनंतर..”

उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) तुम्ही सर्वजण गावागावात आणि घरोघरी जाऊन लोकांना भेटाल. यादरम्यान जर तुमच्यापैकी कुणाला एखादं कुटुंब झोपडीत किंवा कच्चा घरात राहत असेल तर, त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता लिहून मला पाठवून द्या आणि त्या व्यक्तीला सांगा मला मोदीजींनी तुम्हाला पक्क घर देण्यासाठी पाठवलं आहे असे वचन माझ्याकडून देऊन या असे म्हणत माझ्यासाठी तुम्ही सर्वच मोदी असून, तुम्ही घराचं वचन देऊन या ते वचन पूर्ण मी स्वतः पूर्ण करेल अशी ग्वाहीदेखील मोदींनी यावेळी दिली.

‘महायुती सत्तेत आल्यास इचलकरंजीत टेक्सटाईल पार्क उभारणार’; अमित शहांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचं सुख मला मिळालं

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं सुख मिळालं असून, 2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. या दहा वर्षांच्या काळात गरीबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली असून, येणाऱ्या काळातही महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांच घराचं स्वप्न साकार होणार असल्याचं वचन यावेळी मोदींनी दिलं. मराराष्ट्रातील गरीब कुटुंबियांना आणखी घरांची गरज आहे, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ही मागणी मान्य करत नवीन 3 करोड घरे बांधण्याची सुरुवात करण्यात आल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. यातील अनेक घरे महाराष्ट्रात असून यामुळे महाराष्ट्रातील लाखो गरिबांचे पक्के घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यावेळी देशातील सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर असेल यासाठी 80 हजार कोटी रुपये दिल्याचे मोदींनी सांगितले. सत्तेत आल्यानंतर आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे सांगत हा मोदी देशातील करोडो वृद्धांचा मुलगा असून, 70 वर्षांवरील वृद्धांनी खर्चाची चिंता कुणी करू नये कारण लवकरच हा मुलगा उपचारांचा आणि औषधांचा खर्च मोफत करणार असल्याचे मोदी म्हणाले.

आज 8 नोव्हेंबर, मी दिवस मोजणार फक्त तुम्ही.., पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज

जाती जातीत फूट पाडणे हिच काँग्रेसची नीती

भाषणावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जाती जातीत फूट पाडणे हिच काँग्रेसची नीती असून,
देश जितका कमजोर तितकी काँग्रेस मजबूत होते. काँग्रेसने अनुसुचित जाती जमातीचा विकास होऊ दिला नाही असे म्हणत ओबीसी म्हटलं तरी काँग्रेसला चीड येते असा घणाघात मोदींनी केला. काँग्रेस दलित, ओबीसी आणि आदिवासी यांच्यात भांडणं लावण्याचे काम करत असून, ओबीसी आपआपसात लढत राहावे, हिच काँग्रेसची इच्छा असल्याचे मोदी म्हणाले. महाविकास आघाडीचं घोटाळापत्र जाहीर झालं असून, महाविकास आघाडी म्हणजे फक्त घोटाळे आणि भ्रष्टाचाराचं घर आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube