Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन (sangli loksabha) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आधीपासूनच सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात असतानाच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी जाहीर सभेत पैलवान चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धूसफुस सुरु आहे. उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नगर दक्षिण मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. तीसगावमध्ये सभेचे नियोजन करण्यात आले होते. नियोजन फिस्कटल्याने लंके हे नाराज होऊन परतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही जनसंवाद यात्रा नसून फसवणूक यात्रा असल्याची टीका आता […]
Sharad Pawar Group On Ajit pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला […]
Earthquake Himachal Pradesh : देशातील हिमाचल प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake Himachal Pradesh) बसल्याची बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप तरी कोणत्या प्रकारची जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, […]
Rahul Narvekar News : अलिबागच्या नामांतराची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला भूमिपुत्रांकडून कडाडून विरोध केला जात आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अलिबागच्या नामांतराची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली. नार्वेकरांनी मागणी केल्यानंतर आता अलिबागकर चांगलेच भडकले आहेत. नार्वेकरांच्या भूमिकेला विरोध करीत त्यांच्या मागणीचा […]
Punjabrao Dakh : मी नेहमी पावसाचा अंदाज सांगतो, आता मतरुपी पाऊस पाडून विजयी करा, अशी साद हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी परभणीकरांना घातली आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांना वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha) उमदेवारी जाहीर झाली आहे. डख यांनी उमेदवारी जाहीर होताच आपला अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल […]
Udayanraje Bhosle News :‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, असं उत्तर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिलं आहे. दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत (Satara Loksabha Election) शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवाराबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवत आव्हानच दिलं होतं. उदयनराजेंची स्टाईल शरद पवारांनी मारल्याने त्यांची सर्वत्रच चर्चा सुरु होती. […]
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार, अशीच परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha) पाहायला मिळत आहे. धाराशिववरुन रस्सीखेच सुरु असतानाच अखेर अजित पवार गटाकडे (Ncp Ajit Pawar Group) ही जागा गेलीयं. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकरांविरोधात (Omraje Nimbalkar) महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. ‘बडे मियाँ […]
Varsha Gaikwad On Sanjay Nirupam : काँग्रेसने आधी तुम्हाला माफ केलं पण आता करणार नाही, या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना ताकीद दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाबाबत विधान केल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या (Congress) हायकमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात […]
Loksabha Election Ncp Candiate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar Group) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस […]