Chandrashehar Bawankule On Nana Patole : नाना पटोले यांना काय कळतयं, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashehar Bawankule ) यांनी जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे आज मकाऊ दौऱ्यावरुन भारतात दाखल झाले आहेत. मकाऊमध्ये बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा कथिक फोटोवरुन नाना पटोले( Nana Patole) यांनी बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले होते. बावनकुळे यांच्या या कथित फोटोवरुन […]
Operation Silkyara : उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून तब्बल 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांची बोगद्यातून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून मागील 11 दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर एनडीआरएफच्या बचावकार्याने वेग धरला आहे. 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या जवानांनी बोगद्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता 41 मजुरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, एनडीआरएफचे जवाना बोगद्यात […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालन्यातील धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यानंतर आता धनगर आरक्षणासंदर्भात मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये उतरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : आमच्यात येऊ नका म्हणतोयं मग कुठं जातो रं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal)यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या […]
Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खुर्चीचं पावित्रं राखावं, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना(Rahul Narvekar) दिला आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सध्या विधी मंडळात सुरु आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला. ममतांनी शांत राहुन […]
Nana Patole : राजस्थानमधील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांचा अप्रत्यक्षपणे ‘पनौती’ असा उल्लेख केला. त्यावरुन देशात रणकंदन सुरु झालं. याच प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी ‘पनौती’ शब्दाचा सोशल मीडियावर […]
Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 11 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 11 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक […]
Chandrashekhar Bawankule on Sanjay raut : आम्ही काम करुन इमेज तयार केलीयं, खराब प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला लखलाभ, शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, बावनकुळे कुटुबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा फोटो राऊतांनी पोस्ट केला होता. त्यावरुन राज्यात प्रचंड […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर […]
Bageshwar Baba : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजांनी(Bageshwar Baba) संत तुकोबारायांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर आज पुण्यात तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. बागेश्वर बाबांचा पुण्यात तीन दिवसीय कार्यक्रम पार पडत आहे. बागेश्वर बाबांनी तुकोबारांयांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर चूक लक्षात आली का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी(Bageshwar Baba) संत तुकाराम महाराजांबद्दल […]