समृद्धी महामार्गाच्या कामात 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलायं. ते मुंबईत बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
एक नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा नातू अंबानींकडे नाचतो, अशी सडकून टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर केलीयं.
कांदा आणि दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन खासदार निलेश लंके यांनी सुरु केलेलं आंदोलन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आलंय.
खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीयं.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
दुर्बल घटकातील मुलींना व्यवसायिक शिक्षण मोफत देण्याच्या निर्णयानंतर शिंदे सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षापासून मुलींना आता शिक्षण आणि परिक्षा शुल्कात 100 टक्के लाभ देण्यात येणार आहे.
मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, अशी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलीयं. ते नांदेडमध्ये बोलत होते.
लंडनच्या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं पत्र म्युझियमने पाठवल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अद्याप तरी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.