जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अद्याप तरी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
अमेरिकेत ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया केल्यानंतर शंतनूराव किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. लेटस्अप मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अपघातनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर माझं मन हलकं झाल्याचं भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ऋषभ पंतने पंतप्रधान मोदींसमोरच सांगितलं आहे.
चॅंपियन होताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली? याबाबत रोहित शर्माने पंतप्रधान मोदींसमोर खुलासा केलायं.
विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार प्रविण दरेकर चुकल्याचं दिसून आले. पुन्हा महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा असल्याचं विधान दरेकरांनी केलंय.
दुध दरवाढीच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी लंके यांनी मंत्री विखे पाटलांवर सडकून टीका केलीयं.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विशेष समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीयं.
विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार करायचा असेल तर करा, नाही तर उमेदवार मागे घ्या, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलंय.
बिर्यानीशिवाय एकही अधिवेशन झालं नाही, असं सांगत अनिल परब यांनी बाबाजानी दुर्राणींचा बिर्यानीचा किस्सा सभागृहात सांगितला आहे.
लाच लुचपत विभागाकडून कारवाई झाल्यानंतर फरार मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी आज न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलायं. मात्र, सरकारने म्हणणं सादर केलं नसल्याने त्यांचा जामीन लांबणीवर गेला आहे.