ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातील धूम ठोकण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने बडतर्फ करण्यात आले.
हाथरस घटनेप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी भोले बाबांच्या 6 निकटवर्तीयांना जेरबंद केलं असल्याची माहिती आयजी शलभ माथूर यांनी दिलीयं.
भोले बाबांच्या हरि विहार आश्रमात लक्झरी गाड्यांचा ताफा आणि लाखो लोकांची गर्दी होतं असत. या आश्रमात महिलांचीही मोठ्या प्रमाणात गस्त असल्याची माहिती समोर आलीयं.
सुधीर मुनगंटीवार हे कार्यकक्ष मंत्री आहेत, म्हणूनच महाराष्ट्रात राहिले असल्याचं म्हणत आमदार जयंत पाटील यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
'धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही', या शब्दांत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना सुनावलंय. राहुल गांधी यांच्या विधानानंतर पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने आले आहेत.
होय, मी लढणार अन् जिंकणारच, असं म्हणत नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
खासदार अमोल कोल्हे यांची लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रतोपदी निवड करण्यात आलीयं. यासंदर्भात कोल्हे यांनी सोशल मीडियावर माहिती दिलीयं.
मणिपूरचा इतिहास समजून घ्या', या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, काल अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली होती.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत कडक कायदा करण्याची मागणी केलीयं.