मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीयं.
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो, या शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले आहेत. ते संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पायउतार करुन सचिन जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीयं. त्यामुळे सातपुते वेगळी भूमिका घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलायं.
मराठा बांधवांनो तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका, मीच तुमच्या जिल्ह्यात असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलंय. येत्या 6 जुलैपासून जरांगे राज्यभर दौऱ्यावर असणार आहेत.