तू सरळ बोल, आमच्यात काडी लावतोयं का, पण मी लय पुढचा असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळांवर निशाणा साधलायं.
आरक्षण असूनही भांडणं करायची तयारी, मग आम्हाला नाही तर आम्ही किती तयारी दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी ओबीसी बांधवांना दिला आहे.
नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मनोज जरांगे यांची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले.
माजी आमदार के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर जात असल्यानेच ईडीकडून कारवाई केली जात असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी निषेध केलायं.
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मंत्री शंभूराज देसाई यांना हप्ते देत असल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलायं.
पुण्यातील एफसी रोड परिसरातील एका नामंकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आपल्या घरावर चंद्रावरुन कचरा घरावर पडल्याने एका कुटुंबाने थेट नासावर गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी कुटुंबियाने नासाविरोधात 80, 000 डॉलर्सचा दावाच ठोकला आहे.
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.