उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं.
कोल्हापुरकरांनी छत्रपतींच्या गादीलाच मत दिलं असून छत्रपती शाहु महाराज यांनी एक लाखांच्या लीडने महायुतीचे उमदेवार संजय मंडलिकांचा पराभव केलायं.
सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चौथ्या फेरीअखेर 19 हजार मतांनी आघाडी आहेत.
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दुष्काळी परिस्थितीवर सरकारने तातडीने पाऊलं न उचलल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिलायं.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी ध्यानधारणेचे अनुभव शेअर केले आहेत.