झारखंड भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी (Pranav Varma) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.
अरविंद सावंत यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. पण व्यक्तिगत हल्ला होता असे वाटत नाही. मात्र महिलांबद्दल बोलताना काळजी घ्यावी.
एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता.
प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये आयसीयूमधून करू नयेत असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
माहीम विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिपोत्सव कार्यक्रमावेळी लावलेले कंदील हटवले आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
युरोपातील देश स्पेन सध्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. देशात मोठा पूर आला असून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत बंडखोरीची समस्या जास्त आहे. या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली आहे.