सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी महिनाभर पुढे ढकलली आहे.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे.
पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का यासह अन्य गोष्टींची चौकशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे.
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
काहींना आपला पराभव मान्यच नाही मात्र निवडणुकीत हरवलेलं आहेच आता कोर्टातही तेच होईल, असा पलटवार निलेश लंकेंनी केला.
खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.
ईडीने आज शनिवारी हरयाणा राज्यातील सोनीपत येथील काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक केली आहे.
युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. यामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.