Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली […]
Mumbai News : उल्हासनगर येथील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Mumbai Police) प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा मृत्यू झाला. लागोपाठ होत असलेल्या या गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. सर्रास गोळीबार होत असल्याने बंदुकींच्या परवान्यांचा मुद्दा […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]
Jalgaon News : राजकीय वैमनस्यातून गोळीबाराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगावमधील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांचा […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग तर (Samruddhi Highway) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Elections 2024) मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे समर्थित बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासह बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. या […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान भारतात पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला (Team India) दुखापतीने ग्रासले आहे. केएल राहुल […]
PV Narsimha Rao : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना आज भारतरत्न (PV Narsimha Rao) पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत या पुरस्कारांची घोषणा केली. नरसिंहराव यांच्यासह एमएस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाला. पीव्ही नरसिंहराव 1991 ते 1996 या चार वर्षांच्या काळात […]
SAFE U19 Women’s Championship : बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या सैफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत (SAFE U19 Women’s Championship) हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या सामन्यात आधी भारताला (India vs Bangladesh) विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर मात्र भारत आणि बांग्लादेशला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. सामन्यासाठीच्या निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत सामना 1-1 असा बरोबरीत […]
Devendra Fadnavis reaction on Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती देत दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेवर विरोधकांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडींनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया […]