सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सोशल मीडिया आक्षेपार्ह पोस्टवरुन 2 गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेमुळे दोन गट आमने- सामने आले आणि वातावरण तणावग्रस्त बनलं. या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. यानंतर जवळपास 200 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (10th religious incident […]
पुणे : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच चांगलेच राजकारण रंगले आहे. पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा रद्द झालेला प्रस्ताव पुन्हा तयार करून नव्याने सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मध्यवर्ती इमारतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा प्रस्ताव तयार […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे एक्स (ट्विटर) अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. एक्सचे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत बे अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून या अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शरद पवार गटाने […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा अखेर पुणे जिल्ह्यासाठीच्या जिल्हाध्यक्षपदाचा शोध संपला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (Jagannath Shewale) यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीचे […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. शरद पवार यांच्याबाजूनेही नेमके किती आमदार आहेत, याबाबतही खुलासा करण्यात येत नव्हता. आपल्यासोबत आवश्यक आणि गरजेएवढे आमदार असल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र अखेर या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. (Sharad Pawar […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गट मुंबई विभाग अध्यक्ष नवाब मलिक विरुद्ध कार्याध्यक्ष राखी जाधव या दोन बड्या नेत्यांमधील वादाने आणि गटबाजीच्या राजकारणाने टोक गाठल्याचे दिसून येत आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नवाब […]
जालना : आज 12 वाजेपर्यंत सरकारचा चर्चेसाठीचा निरोप येणार होता. पण अद्याप सरकारचा कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही रात्रीपासूनच बॅगा भरुन तयार आहेत. आमचे शिष्टमंडळ तयार आहे. आता आम्ही उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. उद्यापर्यंत काय होतयं बघणार अन्यथा, उद्यापासून सलाईन काढणार आणि पाणीही घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक […]
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण आता कोणीही आंदोलनााला गालबोट लागेल असे कृत्य करु नये. शांततेत रहावे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहुनच आंदोलन करावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. (Manoj Jarange Patil appealed […]
मुंबई : येथील एअर हॉस्टेस रुपल ओगरे (23) (Rupal Ogrey Murder) हिची हत्या करणारा संशयित आरोपी विक्रम अटवाल याने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. आज (8 सप्टेंबर) अंधेरी पोलिस स्टेशनच्या तुरुंगातच पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Air hostess Rupal Ogrey Murder suspect […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या तिन्ही गोष्टी घेऊन राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. याशिवाय उर्वरित मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेमके कोणत्या मुद्द्यावर पाटील यांनी त्यांचे आंदोलन चालू […]