जालना : राज्य सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी स्वीकारले आहे. आता ते किंवा त्यांचे शिष्टमंडळ खास विमानाने मुंबईला जाणार आहेत. यामुळे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टाईला काहीसे यश आल्याचे दिसून येत आहे. निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर, आंदोलकांवरील खटले मागे घेणे आणि […]
जालना : सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची तरतुद असल्याचा सुधारीत जीआर घेऊन या, तुमच्याच हाताने पाणी पितो असे म्हणत माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उलट ऑफर दिली. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे दाखले देणे, खटले मागे घेणे आणि लाठीचार्जचा आदेश […]
मुंबई : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami patil) हिचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी नृत्यासाठी पुन्हा मंचावर उपस्थित राहिली आहे. याशिवाय दहीहंडीच्या निमित्ताने तिने यावेळी पहिल्यांदाच मुंबईतही कार्यक्रम केला. गौतमी पाटीलने आमदार प्रकाश सुर्वे […]
पुणे : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेने (MNS) तयारी सुरु केली असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यानुसार यात पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी थेट अमित ठाकरेंच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या […]
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही त्यांचे दौरे वाढविले आहेत. बारामती आणि बीडमधील सभांनंतर अजित पवार यांची आता 10 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वी ते पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कोल्हापूरला निघण्यापूर्वी त्याच दिवशी अजितदादा पुण्यात रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देणार असल्याची माहिती […]
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेला गदारोळ अद्याप कायम आहे. अशात आणखी एक विधान वादात सापडले आहे. द्रमुकचे खासदार ए राजा यांनी आता सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. तसंच ए राजा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सनातन धर्माच्या मुद्द्यावर थेट […]
जालना : सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]
प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या निकालावर निर्देश देत लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली आहे. कोणत्याही सज्ञान जोडप्यांना एकत्र राहण्याचा आणि शांततामय सहजीवन जगण्याचा अधिकार आहे. पालकांसह इतर कोणालाही त्यांच्या शांततामय सहजीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण अशा जोडप्यांना धमकी दिली किंवा त्रास दिला, तर पोलीस आयुक्त किंवा अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना संरक्षण पुरवावे […]
जालना : सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही आत्ता या, ही कागदपत्रे घेऊन जा आणि तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद […]
मुंबई : राज्यात आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. आज (6 सप्टेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थात नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट काऊंन्सिलपेक्षा कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी […]