Crime : अमरावती : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आई आणि लहान भावाची भूल देऊन हत्या केली आहे. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मृतांची नावं आहेत. आरोपी मुलाने आधी भाजीमध्ये धोतरा मिसळून दोघांना खाऊ घातला. नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने मुलाने एका […]
मुंबई : सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान यांची ताटातूट झाली आहे. पंचतारांकित अय्याशीचे स्टिंग ऑपरेशन व्हायरल होताच कपिल वाधवान यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यास अधिकाऱ्यांना परवानगी दिली. (Kapil Wadhawan sent to Nashik Jail after sting […]
– विष्णू सानप पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन्ही बंडात साथ देणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांना 2024 च्या विधानसभेचा पेपर अवघड असल्याचे बोलले जात आहे. बनसोडे यांना अजित पवार यांच्याच गटाचे शहरातील पदाधिकारीच डावलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळेच अशा चर्चांना शहरात आतापासूनच सुरुवात झाली आहे. (Pimpri MLA Anna Bansode, […]
बारामती : “भरला सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून निघाले. मराठा समाजाला आरक्षण आणि जालना येथील लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज (4 सप्टेंबर) बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच […]
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी, अशी मागणी काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याच्या बातम्या आज काही वृत्तपत्रांमध्ये झळकल्या […]
दिल्ली : रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. या काळात भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू किंवा ओवाळणी देत असतो, जी गोष्ट भाऊ देईल त्याचा ती आनंदाने स्वीकार करते. (Three sisters beat […]
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण पाहत आहोत. तसाच आणखी एक संघर्ष बलाढ्य राजकारणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्याने ग्रामपंचायत आणि बाजार समितीमध्ये धक्के दिलेच. परंतु आता पुतण्या थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल होत आहे. दिवंगत भाजप नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र आणि श्रीगोंदा […]
देशातील आघाडीचे वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे (Harish Salve) तिसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. वयाच्या 68 व्या वर्षी साळवे यांनी त्रिना नावाच्या महिलेशी लग्नगाठ बांधली. लंडनमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक मोठे चेहरे सहभागी झाले होते. वकील कुमार मिहिर मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर साळवे यांच्या लग्न समारंभाचे फोटो शेअर […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. तर काल (3 सप्टेंबर) बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. आता आज सगल तिसऱ्या दिवशी देखील ते कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहणार नसल्याचे […]
सुशीलकुमार शिंदे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय गृहमंत्री. अठराविश्व दारिद्र्य, जातीभेद अशा अडथळ्यांवर मात करत, प्रसंगी रात्रशाळेत जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरची त्यांची पोलीस खात्यातील नोकरी आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात या गोष्टीही अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून गेल्या. कदाचित याच सगळ्यामुळे तळातून वरच्या स्थानापर्यंत पोहचलेल्या काही मोजक्या राजकीय नेत्यांच्या यादीमध्ये शिंदेंचा नंबर वरचा लागतो. (Ex. […]