नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील समजले जाणारे संजय कुमार मिश्रा अखेर अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदावरुन निवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित संचालकाच्या नावाची घोषणा होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहणार आहेत. सरकारने काल […]
पंढरपूर : कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. निवडणुकीच्या वेळी जशी परिस्थिती असेल ते पाहून निर्णय घेतला जाईल. मात्र आम्ही सर्व 48 जागा लढविण्यासाठीच्या दृष्टीने तयारी करत आहोत. सध्या राज्यभर दौरे काढून, महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. पक्षबांधणीची एकच लाईन ठरवून ताकद वाढविण्यार भर दिला जात आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी लोकसभा […]
पणजी : तेलंगणाच्या महिला सुरक्षा शाखा आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने पाच वर्षांपासून बेपत्ता झालेल्या एका महिलेचा अत्यंत हुशारीने शोध लावला आहे. ही महिला पाच वर्षांपूर्वी तेलंगणाच्या हुमायूननगरमधून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर तिने गोवा गाठलं, स्वतःची ओळख बदलली, लूक बदलला आणि धर्म बदलून राहू लागली. काही दिवसातच दुसरे लग्न करुन नवीन संसारही थाटला. मात्र नुकतेच […]
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 17 दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर काल (14 सप्टेंबर) संपुष्टात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे ज्यूस पिऊन उपोषण सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. संपूर्ण राज्यभर गाजलेले हे उपोषण मागे घेतल्याने शिंदे सरकारचाही जीव आता भांड्यात पडला आहे. मात्र जरांगेंना ज्यूस पाजण्यासाठी शिंदे […]
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (K Chandrasekhar Rao) यांनी शुक्रवारी (25 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केसीआर यांनी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ओबीसींसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्याची मागणीही केली. (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao urged Prime Minister Narendra Modi to pass […]
दिल्ली : वैवाहिक आयुष्यातील ताण-तणावामुळे पत्नी किंवा पतीने घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे नैतिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. तर भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये, हिंदू विवाह कायद्यानुसार कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने त्यांचा पती/पत्नी जिवंत असताना आणि घटस्फोट झाला नसल्यास दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. मात्र अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतीच्या बाजूने […]
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनाचा अजेंडा सरकारने जाहीर केला असून यात अनेक महत्त्वाची विधेयके सादर करण्याच्या तयारी सुरु आहे. पण यातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पण या विधेयकात नेमके काय असणार आहे? मंजुरीनंतर यात नेमका काय बदल होणार […]
मुंबई : गणेशोत्सव, दसरा, दिवाशी अशा सणासुदीच्या काळात लोकांनी पुन्हा एकदा कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लोक नॉर्मलपासून पार्टी वेअर ते ऑफिस वेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे, शूज आणि सौंदर्य उत्पादने खरेदी करत आहेत. पण, अंडरवेअर किंवा इनरवेअर खरेदी करण्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जॉकी, डॉलर, […]
मुंबई : राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे फिरवलेली पाठ यामुळे ही नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी आता सर्व मंत्र्यांचे प्रगती पुस्तक मागविण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […]