सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा (Lok Sabha) उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार आहे. सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीच योग्य उमेदवार आहेत, असं म्हणत काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली आहे. ते सोलापूरमधून माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे या […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) वाढदिवस. ते आज 72 व्या वर्षातून 73 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने जगभरातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीया, पत्र, सामाजिक सेवा अशा विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. महाराष्ट्रातूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मोदींना […]
मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केला असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने पोलिसांत धाव घेतली आहे. शिव अनुयायांचा अवमान केल्याप्रकरणी या मंडळाविरोधात गुन्हा दाखल अशी मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मुंबई मराठा क्रांती मोर्चाने पत्र लिहून केली आहे. (Maratha Kranti Morcha’s demand to file a case against lalbagcha raja […]
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंह कोश्यारी, आनंदीबेन पटेल. भाजपची एकेकाळची बडी नावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपर्यंत पोहचविण्यात या नेत्यांचा मोठा रोल होता. पण कालांतराने हे नेते भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत गेले आणि नंतर मार्गदर्शक मंडळात यांचा समावेश झाला. कारण होतं या नेत्यांनी वयाची पूर्ण केलेली पंचाहात्तरी. आता याच नेत्यांच्या यादीत […]
नवी दिल्ली : संसदेच्या 18 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या विशेष अधिवेशनात एक देश-एक निवडणूक यासंबंधीचा निर्णय होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण यासंबंधी नियुक्त केलेल्या कोविंद समितीची पहिली बैठक येत्या 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर याकाळात होणार आहे. त्यानंतर समितीची पहिली बैठक होत आहे. त्यामुळे समितीच्या बैठकीआधी […]
नवी दिल्ली : यावर्षाच्या अखेरीसपर्यंत भारतात दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा एकदा चित्ते आयात केले जाणार आहेत. उद्या (17 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयात केलेल्या आणि नवीन जन्म झालेल्या तब्बल 9 चित्त्यांच्या मृत्यूनंतरही आणखी चित्ते आयात केले जाणार असल्याने विरोधकांकडून या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. (Indian government […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची माहिती दिली. सिंचन, आरोग्य, गृहनिर्माण, ग्रामविकास अशा विविध विभागांसाठी निधीची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे शिंदे […]
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे पोलाद कारखाना सुरू करणार आहे. स्पेनमधील माद्रिदमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्याने स्वतः ही घोषणा केली. (Saurabh Ganguly to set up steel plant at Salboni in Paschim Medinipur, West Bengal.) पोलाद […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपद मिळाली आहेत, त्याचा फायदा करुन घ्या. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात, तर त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेही पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
मुंबई : “तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस” असं एखाद्या पतीने आपल्या पत्नीला म्हणणे हे शिवीगाळ किंवा अपमानास्पद ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. यावेळी पत्नीच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे पतीची बदनामी झाली, कुटुंबियांची प्रतिमा मलिन झाली, हा प्रकार एका पद्धतीने हिंदु विवाह कायद्यानुसार क्ररताच […]